Christmas Special: Zechariah’s Psalm

६७आणि त्याचा बाप जखर्या पवित्र आत्म्याने भरला आणि संदेश देत म्हणाला,
६८इस्राएलाचा देव परमेश्वर धन्यवादित असो.
कारण त्यानं आपल्या लोकांची भेट घेऊन सुटका केली आहे;
६९त्यानं आपला सेवक दावीद ह्याच्या घराण्यात
आमच्यासाठी एक तारणाचं शिग उभारलं आहे.
७०हे त्यानं युगादीपासून आपल्या
पवित्र संदेष्ट्याच्या मुखाद्वारे सांगितलं होतं;
७१ते ह्यासाठी कीआमची आमच्या वैर्‍यांपासून
आणि आमचा द्वेष करणार्‍या सर्वांच्या हातून
सुटका व्हावी.
७२-७३म्हणजे त्यानं आमच्या पूर्वजांवर दया करून
आणि आपला पवित्र करार
म्हणजे आमचा पिता अब्राहाम ह्याला
शपथ घेऊन दिलेलं वचन स्मरून
७४त्यानं आम्हाला असं द्यावं की,
आमची आमच्या वैर्‍यांच्या हातून
सुटका होऊन
७५आम्ही आमच्या सर्व दिवसांत
पावित्र्यानं आणि नीतिमत्वानं
त्याच्यासमोर त्याची सेवा करावी.
७६आणि बाळतुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील.
कारण तू प्रभूसमोर त्याचे मार्ग तयार करावेस
म्हणून त्याच्यापुढं चालशील;
७७आणि तू त्याच्या लोकांना त्यांच्या
पापांच्या क्षमेच्या द्वारे तारणाचं ज्ञान देशील.
७८कारण आमच्या देवाच्या दयेच्या
कळवळ्यामुळं वरून उदयप्रकाश
आमच्यावर येईल.
७९ह्यासाठी कीत्यानं जे अंधारात
आणि मृत्यूच्या छायेत बसलेत
त्यांना प्रकाश द्यावा,
आणि आमचे पाय शांतीच्या मार्गाकडे न्यावेत.

Luke 1:67-79 (Nava Karar R. H. Kelkar Translation)

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s