2 John

योहानाचे दुसरे पत्र

—–२ योहान—–

१-२वडिलाकडून;
निवडलेल्या बाईस व तिच्या मुलांसः
आपल्यात जे सत्य रहात आहे, आणि आपल्याबरोबर जे सर्वकाळ राहील त्या सत्यामुळे, मी त्या सत्यात तुमच्यावर प्रीती करतो, आणि केवळ मीच नाही पण ज्यांना ते सत्य समजले आहे ते सर्वच करतात. देवपिता व पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्यांची कृपा, दया व शांती सत्यात व प्रीतीत आपल्याबरोबर राहतील.
पित्याकडून आपल्याला आज्ञा मिळाल्याप्रमाणे सत्यात चालणारी तुझी काही मुले मला आढळल्याने मी फार आनंदित झालो. आणि बाई, तुला आता मी नवी आज्ञा म्हणून लिहीत नाही, पण स्मरण देतो की,प्रारंभापासून आपल्याजवळ जी आज्ञा आहे त्या आज्ञेप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी. आणि त्याच्या आज्ञांप्रमाणे चालणे ही प्रीती आहे. तुम्ही प्रारंभापासून ऐकल्याप्रमाणे तिला अनुसरून तुम्ही चाला, ही आज्ञा आहे. कारण येशू ख्रिस्त देह धारण करून आला हे न पतकरणारे पुष्कळ फसव्ये जगात आले आहेत; आणि असाच मनुष्य फसव्या व ख्रिस्तविरोधी आहे. म्हणून तुम्ही स्वतःला जपा; म्हणजे आम्ही तुमच्यात केलेल्या गोष्टी तुम्ही गमावू नयेत, पण तुम्हाला पूर्ण प्रतिफळ मिळावे.
जो कोणी फार पुढे जातो व ख्रिस्ताच्या शिक्षणात रहात नाही त्याला देव नाही; जो कोणी ख्रिस्ताच्या शिक्षणात राहतो त्याला पिता व पुत्र हे दोघेही आहेत. १०जर हे शिक्षण न देणारा कोणी मनुष्य तुमच्याकडे आला तर तुमच्या घरात त्याचे स्वागत करू नका किवा त्याला जयजय म्हणू नका. ११कारण त्याला जयजय म्हणणारा त्याच्या वाईट कामांत भागीदार होतो.
१२माझ्याजवळ तुम्हाला लिहिण्यास पुष्कळ गोष्टी असल्या तरी मी कागद व शाई घेऊन लिहू इच्छीत नाही;पण आशा करतो की, आपला आनंद पूर्ण व्हावा म्हणून मला येऊन तुमच्याशी तोंडोतोंड बोलता येईल. १३तुझ्या निवडलेल्या भगिनीची मुले तुला सलाम देतात.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s