2 Thessalonians

थेसलनिकेकरांस दुसरे पत्र

—–२ थेसल १—–

पौल, सिलवान व तिमथ्य ह्यांजकडून;
देव आपला पिता, आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या समागमातील थेसलनिकेकरांच्या मंडळीसः
देव आपला पिता, आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हाला कृपा व शांती.

बंधूंनो, आम्ही तुमच्यासाठी देवाचे नित्य उपकार मानण्यास बांधलेले आहो, आणि ते योग्यच आहे; कारण तुमचा विश्वास पुष्कळ वाढत आहे व एकमेकांवरील तुमची प्रीती तुमच्यामधील प्रत्येक जणात वाढत आहे. म्हणून तुम्ही सोशीत आहात त्या तुमच्या सर्व छळांत व संकटांत तुमचा धीर आणि विश्वास पाहून आम्ही स्वतः देवाच्या मंडळ्यांत तुमच्याविषयी अभिमान मिरवतो. ह्यात देवाच्या उचित न्यायाचा पुरावा आहे. म्हणजे तुम्ही ज्यासाठी सोशीत आहा त्या, देवाच्या राज्यासाठी तुम्ही लायक गणले जावे.
६-७कारण देवासमोर हे न्याय्य आहे की, जेव्हा स्वर्गातून प्रभू येशूचे त्याच्या बलवान दूतांसहित तळपणार्‍या अग्नीत येणे होईल तेव्हा जे तुम्हाला नाडतात त्यांची दुःखाने फेड करावी व जे तुम्ही नाडले जात आहा त्या तुम्हाला आमच्याबरोबर विसावा द्यावा; तेव्हा जे देवाला ओळखीत नाहीत व जे आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड घेईल. ९-१०जेव्हा त्याच्या पवित्र जनांत त्याचे गौरव व्हावे, आणि सर्व विश्वास ठेवणार्‍यांत त्याची वाहवा व्हावी म्हणून तो येईल, (कारण आम्ही तुमच्यात दिलेल्या साक्षीवर विश्वास ठेवण्यात आला) त्या दिवशी, त्यांना प्रभूच्या तोंडापुढून व त्याच्या शक्तीच्या तेजापुढून सार्वकालिक नाशाची शिक्षा दिली जाईल.
११ह्यासाठीही आम्ही तुमच्याकरता नित्य प्रार्थना करतो की, आपल्या देवाने तुम्हाला त्याच्या पाचारणासाठी योग्य ठरवावे, आणि, तुमच्या सदिच्छेची प्रत्येक सुयोजना आणि विश्वासाची कृती त्याने आपल्या सामर्थ्याने पूर्ण करावी. १२म्हणजे आपल्या देवाच्या व प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने, तुमच्या द्वारे, आपल्या प्रभू येशूचे नाव गौरविले जावे आणि त्याच्या द्वारे तुम्ही गौरविले जावे. 

—–२ थेसल २—–

आता बंधूंनो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे व आपले त्याच्याबरोबर एकत्र जमणे हे होण्याच्या बाबतीत आम्ही तुम्हाला विनंती करतो की, प्रभूचा दिवस आला आहे असे सुचविणार्‍या आत्म्यामुळे, किंवा भाषणामुळे, किंवा आमच्याकडून जणू आले आहे अशा एखाद्या पत्रामुळे तुम्ही मनात अस्थिर होऊ नका, किंवा घाबरू नका. तुम्ही कोणाला कोणत्याही प्रकारे तुमची फसवणूक करू देऊ नका; त्याअगोदर, प्रथम विश्वासाचा त्याग होऊन, तो अनाचारकारी प्रकट केला जाईल; तो नाशाचा पुत्र आहे. तो विरोध करणारा आहे व ज्यांना देव म्हणतात किंवा भजनीय मानतात अशा सर्वांहून स्वतःला उंच करणारा आहे, त्यामुळे तो आपण देव आहोत असे दाखवीत देवाच्या मंदिरात बसतो.
मी तुमच्याजवळ होतो तेव्हा हे तुम्हाला सांगितले होते, ह्याची तुम्हाला आठवण नाही काय? आणि त्याला त्याच्याच काळात प्रकट करावे,  म्हणून आता काय अडवीत आहे ते तुम्हाला माहीत आहे. कारण अनाचाराचे रहस्य आताही कार्य करीत आहे; मात्र जो प्रतिबंध करीत आहे तो मधून एकीकडे केला जाईपर्यंत प्रतिबंध करील. मग, तो अनाचारकारी प्रकट केला जाईल, आणि प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने त्याला ठार मारील व त्याला आपल्या समक्षतेच्या प्रकाशाने नष्ट करील. सैतानाच्या कृतीमुळे त्याचे येणे होईल; तो सर्व प्रकारे खोटे पराक्रम, तशीच चिन्हे व अद्भुते करीत येईल १०व ज्यांचा नाश होणार आहे त्यांच्यासाठी तो अनीतीच्या प्रत्येक प्रकारच्या फसवेपणाने प्रगट होईल. कारण त्यांनी आपले तारण होण्यास सत्याची प्रीती स्वीकारली नाही. ११आणि म्हणून देव त्यांच्यावर असा संभ्रमाचा परिणाम पाडील की, त्यांनी लबाडीवर विश्वास ठेवावा. १२म्हणजे, ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही, पण ज्यांना अनीतीत संतोष वाटला त्यांचा न्याय केला जावा.
१३पण बंधूंनो, प्रभूच्या आवडत्यांनो, आम्ही तुमच्यासाठी देवाचे नित्य उपकार मानण्यास बांधलेले आहोत; कारण देवाने तुम्हाला प्रारंभापासून आत्म्याच्या प्रकटीकरणाद्वारे व सत्यावरील विश्वासाद्वारे तारणासाठी निवडले आहे. १४आणि, त्याने आपल्या सुवार्तेद्वारे तुम्हाला त्यासाठी बोलावले आहे. म्हणजे तुम्ही आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे गौरव मिळवावे. १५म्हणून बंधूंनो, स्थिर रहा, आणि आम्ही वचनाद्वारे व आमच्या पत्राद्वारे तुम्हाला शिकविलेल्या प्रथा पाळा.
१६आता, स्वतः आपला प्रभू येशू ख्रिस्त, आणि ज्याने आपल्यावर प्रीती केली आणि आपल्याला, कृपेच्या द्वारे, सार्वकालिक सांत्वन व चांगली आशा दिली तो देव आपला पिता १७तुमच्या मनाचे सांत्वन करो, आणि तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या चांगल्या कामात व भाषणात स्थिर करो.  

—–२ थेसल ३—–

शेवटी, बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करीत जा; ह्यासाठी की, प्रभूचे वचन पुढे जावे आणि तुमच्यात झाले तसे त्याचे गौरव व्हावे; आणि विपरीत व दुष्ट लोकांपासून आमची सुटका व्हावी; कारण सर्वच मनुष्यांत विश्वास नाही. पण प्रभू विश्वासू आहे; तो तुम्हाला स्थिर करील आणि वाइटापासून राखील. आणि प्रभूमध्ये तुमच्याविषयी आम्हाला अशी खातरी आहे की, ज्या गोष्टींची आम्ही तुम्हाला आज्ञा दिली आहे त्या तुम्ही करता व कराल. आणि प्रभू तुमची अंतःकरणे देवाच्या प्रीतीत व ख्रिस्ताच्या धीरात नीट पुढे नेवो.
आता बंधूंनो, आम्ही तुम्हाला आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने आज्ञा देतो की, आमच्याकडून स्वीकारलेली प्रथा सोडून, ऐदीपणात चालत असलेल्या प्रत्येक बंधूपासून दूर व्हा. कारण तुम्ही कशा प्रकारे आमचे अनुकरण केले पाहिजे हे स्वतः जाणता; कारण, आम्ही तुमच्यात अयोग्य प्रकारे वागलो नाही.
आणि आम्ही कोणाची भाकर फुकट खाल्ली नाही; पण आम्ही तुमच्यातील कोणावरही भार घालू नये, म्हणून रात्रंदिवस कष्ट व दगदग सोसून काम केले; आम्हाला हक्क नाही असे नाही, पण तुम्हाला आमचे अनुकरण करण्यास आमचे उदाहरण करावे म्हणून केले. १०कारण, आम्ही तुमच्यात असतानादेखील तुम्हाला आज्ञा दिली होती की, जर कोणाची काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये. ११कारण, आम्ही ऐकतो की, तुमच्यात काही जण ऐदीपणात चालत असून काहीही काम न करता ते लुडबुड करतात. १२आता, जे असे असतील त्यांना आम्ही आज्ञा देतो, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने बोध करतो की, त्यांनी स्वस्थ राहून काम करावे व आपली स्वतःची भाकर खावी.
१३पण तुम्ही, बंधूंनो, चांगले करण्यात खचू नका. १४आणि ह्या पत्रातील आमचे म्हणणे कोणी ऐकले नाही, तर तो मनुष्य लक्षात ठेवा, आणि त्याला लज्जित वाटावे म्हणून त्याच्याशी संबंध ठेवू नका. १५तरी त्याला वैरी म्हणून गणू नका, पण बंधू म्हणून बोध करा.
१६आता स्वतः शांतीचा प्रभू तुम्हाला सर्वदा, सर्व प्रकारे शांती देवो, प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो.
१७माझा पौलाचा स्वहस्ते सलाम; ही प्रत्येक पत्रात खूण असते म्हणून मी लिहितो.
१८आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s