3 John

योहानाचे तिसरे पत्र

—–३ योहान—–

वडिलाकडून;
प्रिय गायस ह्यासः
मी सत्यात तुझ्यावर प्रीती करतो.
माझ्या प्रिया रे, तुझ्या आत्म्याची उन्नती होत आहे, तशीच तुझी सर्व गोष्टींत उन्नती व्हावी व तुझी प्रकृती सुदृढ रहावी अशी तुझ्याकरता मी प्रार्थना करतो. कारण तू सत्यात चालतोस, आणि तुझ्यातील सत्याविषयी, आलेल्या बंधूंनी साक्ष दिली तेव्हा मी फार आनंदित झालो. माझी मुले सत्यात चालतात हे ऐकण्यापेक्षा मोठा आनंद मला नाही.
माझ्या प्रिया रे, तू ह्या परक्या बंधूंसाठी जे करीत आहेस ते विश्वासूपणे करीत आहेस आणि त्यांनी तुझ्या प्रीतीविषयी मंडळीपुढे साक्ष दिली. तू त्यांना, आता, देवाला आवडेल अशा प्रकारे जर वाटेस लावशील तर बरे करशील. कारण, ते त्याच्या नावाकरता निघाले आहेत आणि परजनांकडून ते काही घेत नाहीत. म्हणून आपण अशांचा पाहुणचार केला पाहिजे, म्हणजे आपण सत्याचे सहकारी होऊ.
मी मंडळीला लिहिले होते, पण त्यांच्यात प्रमुख होऊ पाहणारा दियत्रफेस आमचा स्वीकार करीत नाही. १०म्हणून, मी आलो तर, तो ज्या गोष्टी करीत आहे त्यांची आठवण देईन; तो आमच्याविरुद्ध वाईट बोलून बडबडत असतो, पण तेवढ्यात संतुष्ट रहात नाही; तो अशा बंधूंचे स्वागत करीत नाही; आणि ज्यांची तशी इच्छा असेल त्यांना मना करतो आणि मंडळीमधून काढतो.
११माझ्या प्रिया रे, वाइटाचे अनुकरण करू नकोस पण चांगल्याचे कर. जो चांगला आहे तो देवाचा आहे; पण जो वाईट करतो त्याने देवाला पाहिलेले नाही.
१२दिमेत्रियस हा सर्वांची व तशीच सत्याची साक्ष मिळवीत आहे; हो, आम्हीही साक्ष देतो आणि आमची साक्ष खरी आहे हे तुम्ही जाणता. १३तुला लिहिण्यास पुष्कळ गोष्टी माझ्याजवळ होत्या, पण शाई व लेखणी घेऊन मी लिहू इच्छीत नाही. १४परंतु मी आशा करतो की, मी तुला लवकर भेटेन आणि आपण तोंडोतोंड बोलू. तुला शांती असो. मित्र तुला सलाम पाठवतात; मित्रांना नावाने सलाम दे.

 

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s