Philemon

फिलेमोनाला पत्र

—–फिलेमोन—–

ख्रिस्त येशूचा बंदिवान पौल व बंधू तिमथ्य ह्यांजकडून;
आमचे प्रिय जोडीदार-कामकरी फिलेमोन, भगिनी अफ्फिया व आमचा जोडीदार-सैनिक अर्खिप, आणि तुमच्या घरात जमणारी मंडळी ह्यांसः
देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हाला कृपा व शांती.

४-५मी तुमच्या प्रभू येशूवरील व त्याच्या सर्व पवित्र जनांवरील प्रीतीविषयी व विश्वासाविषयी ऐकत असता, मी माझ्या प्रार्थनांत नित्य तुमची आठवण करून, माझ्या देवाचे उपकार मानतो; आणि हे मागतो की, तुमच्या विश्वासाची भागी आपल्याला ख्रिस्तात प्राप्त होणार्‍या, सर्व चांगल्या गोष्टींच्या ज्ञानात पुढे नेणारी अशी व्हावी. कारण तुमच्या प्रीतीमुळे मला मोठा आनंद झाला असून माझे सांत्वन झाले आहे; कारण बंधू,तुमच्यामुळे पवित्र जनांचे जीव पुन्हा स्वस्थ झाले आहेत.
म्हणून जे काही योग्यच होईल ते ख्रिस्तात तुम्हाला आज्ञा देऊन सांगण्यात जरी मला धैर्य आहे, तरी आता,मी म्हातारा पौल, ख्रिस्त येशूचा बंदिवान म्हणून तुम्हाला प्रीतीस्तव विनंती करतो.
१०मी माझ्या मुलाकरता, मी ज्याला माझ्या बेड्यांत जन्म दिला त्या अनेसिमकरता विनंती करतो. ११तो पूर्वी तुम्हाला निरुपयोगी होता पण आता, तुम्हाला व तसाच मला उपयोगी आहे. १२म्हणून मी त्याला, म्हणजे माझ्या जिवाला, तुमच्यासमोर धाडले आहे. १३मी त्याला माझ्याजवळ ठेवले असते, म्हणजे तुमच्या वतीने,त्याने माझ्या सुवार्तेच्या बेड्यांत माझी सेवा केली असती. १४पण, तुमच्या संमतीशिवाय मी काही करावे अशी माझी इच्छा नाही, म्हणजे जणू निरुपायाने तुमचा उपकार होऊ नये, पण स्वेच्छेने व्हावा. १५कारण कदाचित्,तो घटकाभर एवढ्यासाठीच गेला असेल की, सर्वकाळसाठी तो तुम्हाला मिळावा. १६आता दास म्हणून नाही,पण दासाहून अधिक झालेला, विशेषतः मला, पण त्याहून आणखी अधिक तुम्हाला, तो दैहिक नात्यात व प्रभूच्या संबंधात प्रिय बंधू म्हणून तुम्हाला मिळावा.
१७तुम्ही मला भागीदार मानता तर माझ्याकरता त्याचा स्वीकार करा. १८त्याने तुमचे नुकसान केले असेल किवा तो काही देणे लागत असेल तर ते माझ्या हिशोबी घाला. १९मी पौल हे स्वहस्ते लिहीत आहे; मी फेड करीन. तरी तुम्ही आपल्या स्वतःचे मला शिवाय देणे लागता ह्याचा उल्लेख मी करीत नाही. २०हो बंधू, मला तुमच्याकडून प्रभूमध्ये उपकार घेऊ द्या; ख्रिस्तात माझा जीव पुन्हा स्वस्थ करा. २१मी तुमच्या आज्ञापालनाविषयी मनात भाव ठेवून हे तुम्हाला लिहीत आहे; आणि मी जाणतो की, तुम्ही माझ्या म्हणण्यापेक्षा अधिकही कराल.

२२पण शिवाय माझ्यासाठी पाहुण्याची खोली तयार ठेवा; कारण तुमच्या प्रार्थनांमुळे मी तुम्हाला दिला जाईन अशी आशा मी करीत आहे.
२३ख्रिस्त येशूत माझा जोडीदार-बंदिवान एपफ्रास हा तुला सलाम पाठवीत आहे; २४तसेच माझे जोडीदार-कामकरी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हेही तुम्हाला सलाम पाठवतात.
२५आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन.

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s