Titus

तीताला पत्र

—–तीत १—–

देवाचा दास व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याजकडून;
देवाने स्वतः निवडलेल्या त्याच्या लोकांच्या विश्वासासाठी, सुभक्तीच्या मार्गी लावणार्‍या सत्याविषयीच्या ज्ञानासाठी, आणि जो देव खोटे बोलू शकत नाही त्याने युगांच्या काळाअगोदर ज्याविषयी वचन दिले होते त्या सार्वकालिक जीवनाच्या आशेसाठी, पण त्याने नेमलेल्या काळात, त्याने आपले त्याविषयीचे वचन घोषणेद्वारे प्रगट केले, आणि आपल्या तारक देवाच्या आज्ञेने ते माझ्यावर सोपविण्यात आले आहे; ह्या समाईक विश्वासातील, खर्‍या अर्थाने, माझा पुत्र तीत ह्यासः
देव जो पिता, आणि ख्रिस्त येशू आपला तारणारा ह्यांजकडून कृपा, दया व शांती.

मी तुला क्रेतात ह्यासाठी ठेवले की, राहिलेल्या गोष्टी तू नीट कराव्यास व तुला आज्ञा दिल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील नेमावेस.
असा कोणीही निर्दोष असावा, तो एका पत्नीचा पती असावा व त्याची मुले विश्वास ठेवणारी असावीत; त्यांच्यावर दंगलीचा आरोप येऊ नये; आणि ती अवमान करणारी नसावीत. कारण रक्षक देवाचा कामकरी असतो म्हणून निर्दोष असला पाहिजे. तो स्वच्छंदी असू नये, रागीट असू नये, मद्यपी असू नये, भांडणारा असू नये, अयोग्य लाभ मिळविणारा असू नये. तो आतिथ्यप्रेमी व परोपकारप्रेमी, समंजस व नीतिमान, आणि पवित्र व संयमशील असावा. आणि त्याच्या शिक्षणातील विश्वसनीय वचन बळकट धरून राहणारा असावा;म्हणजे, चांगल्या शिकवणीने बोध करण्यास आणि विरोधकांना दोषी ठरविण्यास तो समर्थ असावा.

१०कारण अवमान करणारे, निष्फळ बोलणारे व फसवणारे पुष्कळ आहेत; विशेषतः त्यांच्यात सुनत पाळणार्‍यांपैकी पुष्कळ आहेत. ११त्यांची तोंडे बंद केली पाहिजेत; त्यांनी शिकवू नयेत त्या गोष्टी ते अयोग्य लाभासाठी शिकवतात, आणि संपूर्ण घराणी अवमार्गास लावतात. १२त्यांच्यामधील त्यांच्याच एका संदेष्ट्याने म्हटले आहे की, क्रेती लोक हे नेहमीचे लबाड, दुष्ट पशू व आळशी खादाड आहेत. १३ही साक्ष खरी आहे. तर त्यांनी विश्वासात स्थिर व्हावे म्हणून तू त्यांचा निषेध कर. १४त्यांनी यहुदी कहाण्यांकडे, आणि सत्याकडून वळविणार्‍या, मनुष्यांच्या आज्ञांकडे लक्ष देऊ नये. १५जे शुद्ध आहेत अशा लोकांना सर्व गोष्टी शुद्ध आहेत; पण जे विटाळलेले आहेत, आणि विश्वास ठवीत नाहीत अशांनाच काही शुद्ध नाही; पण त्यांचे मन आणि विवेक हेही मलीन आहेत. १६ते लोक आम्ही देवाला ओळखतो असे उघड सांगतात, पण ते कृतींत त्याला नाकारतात. ते अमंगळ व अवमान करणारे, आणि कोणत्याही चांगल्या कामात कसोटीस न उतरलेले आढळतात.

—–तीत २—–

पण चांगल्या शिकवणीस शोभणार्‍या गोष्टी तू स्वतः शिकवीत जा.
त्या अशा की, वृद्ध पुरुषांनी संयमशील, गंभीर व समंजस व्हावे, आणि विश्वास, प्रीती व धीर ह्यांत सुदृढ व्हावे.
वृद्ध स्त्रियांनी, त्याचप्रमाणे, आपल्या आचरणात भक्तिशील व्हावे; निदक किवा मद्यासक्त होऊ नये; चांगले शिक्षण देणार्‍या व्हावे. आणि आपल्यातील तरुण स्त्रियांना शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या पतींवर व मुलांवर प्रेम करावे. आणि त्यांनी समंजस, शुद्धाचरणी, घर संभाळणार्‍या ममताळू व पतीला आज्ञांकित राहणार्‍या व्हावे; म्हणजे देवाच्या वचनाची निदा होऊ नये.
आणि तसेच तरुण पुरुषांनी समंजस मनाचे व्हावे म्हणून, तू त्यांना बोध कर.
तू सर्व गोष्टींत चांगल्या कामांचे उदाहरण असे स्वतःला दाखव; तुझ्या शिक्षणात निर्मलपणा, प्रामाणिकपणा, आणि निरपवाद चांगली शिकवण दिसू दे, म्हणजे विरोध करणार्‍याला तुझ्याविषयी बोलण्यास काही वाईट न मिळून तो लज्जित व्हावा.
आणि दासांनी सर्व गोष्टींत त्यांच्या स्वामींच्या आज्ञेत रहावे, त्यांना संतोष देणारे व्हावे आणि उलट बोलू नये;
१०त्यांनी चोर्‍या करू नयेत तर सर्व गोष्टींत चांगला विश्वासूपणा दाखवावा;
आणि आपल्या तारक देवाच्या शिकवणीस, सर्व लोकांत, त्यांनी शोभा आणावी; असा तू त्यांना बोध कर.

११कारण, सर्व लोकांस तारणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे. १२ती आपल्याला शिकवते की, अभक्तीचा व ऐहिक वासनांचा त्याग करून, आपण ह्या आताच्या युगात संयमाने, नीतीने व सुभक्तीने जगावे. १३आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी. १४आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी,आणि त्याने चांगल्या कामांत आवेशी असलेले विशिष्ट लोक आपल्या स्वतःसाठी शुद्ध करावेत. १५तू ह्या गोष्टी समजावून सांग, बोध कर, आणि, सर्व अधिकार चालवून निषेध कर. कोणी तुझा उपहास करू नये.

—–तीत ३—–

तू त्यांना आठवण दे की, त्यांनी सत्ता व अधिकार मानून अधिकार्‍यांच्या आज्ञेत रहावे व प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार असावे. कोणाची  निदा करू नये, भांडखोर नसावे, पण सहनशील होऊन सर्वांना सर्व गोष्टींत सौम्यता दाखवावी.
कारण आपणही एकदा अविचारी, अवमान करणारे व बहकलेले होतो; नाना वासनांचे व सुखांचे दास होतो, कुवृत्तीत व मत्सरात होतो. आपण अमंगळ मानले गेलो व एकमेकांचा द्वेष केला.
पण आपल्या तारक देवाची दया
व मानवजातीवरील प्रीती प्रगट झाली,
तेव्हा आपण केलेल्या,
नीतिमत्वाच्या कामांमुळे नाही,
  पण त्याने आपल्याला त्याच्या दयेमुळे,
  नव्या जन्माचे स्नान घालून
  पवित्र आत्म्याच्या नवीकरणाने तारले.
आणि आपल्या तारक येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्यावर तो आत्मा विपुलतेने ओतला.
म्हणजे आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून
सार्वकालिक जीवनाच्या आशेप्रमाणे
वारीस व्हावे.  
हे एक विश्वसनीय वचन आहे आणि माझी इच्छा आहे की, तू ह्या गोष्टी निक्षून सांगत जा. म्हणजे, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगल्या कामात राहण्याची काळजी घ्यावी. ह्या गोष्टी चांगल्या असून लोकांकरता हितकारक आहेत.
पण मूर्खपणाचे वाद, वंशावळी, कलह, आणि नियमशास्त्राविषयीची भांडणे टाळीत जा; कारण ह्या गोष्टी निरुपयोगी आणि व्यर्थ आहेत. १०वितंडवादी मनुष्याला पहिला व दुसरा बोध केल्यावर आपल्यापासून दूर ठेव. ११तू जाणतोस की, असा मनुष्य बहकलेला असतो व स्वतः पाप करीत राहिल्याने त्याच्याकडून त्याचा स्वतःचा न्याय होतो.

१२मी अर्तमाला किवा तुखीकला तुझ्याकडे धाडून दिल्यावर, तू माझ्याकडे निकापलीसला निघून येण्याचा प्रयत्न कर; कारण मी तेथे हिवाळा घालविण्याचे ठरवले आहे. १३जेना शास्त्री व अपुल्लो ह्यांना काही उणे पडणार नाही अशा प्रकारे पोहोचते कर.
१४आणि आपल्या लोकांनी आपल्या आवश्यक गरजांसाठी चांगली कामे करण्यास शिकावे; म्हणजे त्यांनी निष्फळ होऊ नये.
१५माझ्याबरोबरचे सगळे तुला सलाम देतात. जे आपल्यावर विश्वासामुळे प्रीती करतात त्यांना माझा सलाम दे. तुम्हा सर्वांबरोबर कृपा असो.

————————–
३:४-७ मूळ ग्रीक भाषेत हे एक गीत असावे

Advertisements

Write Your Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s